शनिवार, २३ मे, २०२०

बॉलीवूड आणि मॉब लीन्चींगअगदी बरोबर, अर्णब सर, मला बॉलीवूड मधील काही सेलिब्रिटींच्या ढोंगीपणा बद्दल शंका आहे. जणू काही लोक काही राजकीय पक्षांच्या छुप्या एजेंडा किंवा प्रायोजकत्वा खाली काम करतात. किंवा नाणीच्या दुसर्‍या बाजूला पाहता; त्यांची माणुसकी आणि सहानुभूती कदाचित एका विशिष्ट धर्माबद्दल आणि विशिष्ट समुदायासाठी असते असे वाटते.

स्मरणार्थ : मुंबई महाराष्ट्रा पासून १० किमी. अंतरावर असलेल्या पालघर येथे १६ एप्रिल, २०२०, रोजी दोन साधू आणि त्यांच्या ड्रायव्हरवर हल्ला करण्यात आला.

तेव्हा या घटनेनंतर मला काही बॉलीवूड सेलिब्रिटींना विचारायचे आहे की, “तुम्हाला हा देश आता  जगणे योग्य वाटते की नाही? आपण आता रस्त्यावर ‘मेणबत्ती मार्चकाढणार की नाही? ठीक आहे, मी सहमत आहे की सध्या आपल्याकडे कोरोना महामारीच्या लॉक-डाउनचं निमित्त आहे, परंतु कमीत कमी काही निंदनीय विधाने तरी आपल्या श्री मुखांतून बाहेर यायला हवी होती.”

पण तसे झाले नाही. ही अत्यंत आश्चर्य आणि गंभीर चिंतेची बाब आहे.

वर्तमानपत्रे आणि वृत्तवाहिन्या भरण्यासाठी ज्यांचे वक्तव्य वापरले जातात असे थोर अभिनेते, निर्माता, दिग्दर्शक आणि लेखक कुठे गायब झाले? या वेळी हे सर्व तथा कथित मानवता वादी कुठे होते?

असो, मी आपल्या युक्तिवादाशी सहमत आहे की आपण कोणालाही त्यांच्या मतासाठी भाग पाडू शकत नाही. ‘भारतीय राज्य घटनेतील अनुच्छेद १९(१) (अ) म्हणते की सर्व नागरिकांना भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे. म्हणजेच तोंड, शब्द, लेखन, छपाई, चित्रे किंवा इतर कोणत्याही पद्धतीने स्वत:चे मत मुक्तपणे व्यक्त करण्याचा हक्क.’

भारत खरोखरच एक लोकशाही देश असल्याने हे आपल्याकडे खऱ्या अर्थाने मान्य आहे.

पण दु:ख केव्हा होतं माहित आहे? जेव्हा विशिष्ट धर्म किंवा समुदायाविरूद्ध अशी लज्जास्पद घटना घडते अर्थातच अशा प्रकारची मॉब-लिंचिंग घडते तेव्हा मोठ्या संख्येने ही ख्यातनाम व्यक्ती गोंधळ घालतात. मॉब-लिंचिंग विरूद्ध कायदा करण्यासाठी बॉलिवूड मधील जवळपास ४९ सेलेब्रिटी पंतप्रधानांना पत्र लिहितात. ह्यासाठी त्यांना सलाम. त्यांच्या मानवता वादी विचारांना सलामहे एक उदात्त कारण होते. परंतु जेव्हा इतर धर्म किंवा समुदायावर असे प्रकार घडतात तेव्हा हे महान आत्मे गप्प बसतात. एक पिन-ड्रॉप साइलेंस पसरते. नक्की तेव्हाच दु:ख होतं.

आणि हे वारंवार होत असतं. कथेचा हाच एक दु:खद भाग आहे. हा काळ असा असतो की जेव्हा आपल्या मनात नकळत विचार येऊन जातं की येथे काही षडयंत्र तर नाही ना? लपविलेले काही राजकीय एजेंडे तर नाहीत ना? काहींचे काहींवर केलेले गुप्त उपकार तर नाहीत?

मित्रांनो, आम्ही जास्तीत जास्त मनोरंजन प्रकारची सामग्री तयार करनाऱ्या जगातील सर्वात मोठ्या उद्योगातील अर्थातच बॉलीवूड कलाकार आहोत. आम्ही येथे ‘विभिन्न धर्म, जाती आणि समुदाय यांचा समावेश असलेल्या कलाकारांचा एक महान गट’ म्हणून काम करतो. कोणत्याही भेदभावा शिवाय व एक अविभाज्य घटक म्हणून. तेव्हां या महान सेलिब्रिटींना माझी विनंती आहे की कृपया आम्हा सर्वांना शांततेने व समरसतेने राहु द्या. आमच्या निष्पाप मेंदूला भ्रष्ट करू नका. तुमच्या पाया पडतो.

मी असे म्हणत नाही की या महान व्यक्तींनी त्या बाबतीत राष्ट्रामध्ये किंवा जगात कुठेही घडणार्‍या घटनेबद्दल आपले मत देऊ नये. पण माझी एकच हार्दिक विनंती आहे की आपण आपली मते तठस्त राखा. कृपया तपासून घ्या की त्या राजकीय दृष्ट्‍या प्रेरित तर नाहीत किंवा त्यात एखादे छुपे राजकीय एजेंडे तर नाहीत ना. बस एवढंच. कारण आम्ही सर्व तुच्छ प्राणी आमचे मार्गदर्शन आणि प्रेरणा प्रकाश यासाठी आपल्या सारख्या थोर आत्म्यांकडे पाहत असतो.

हे ब्लॉग संपवण्यापूर्वी, मी आपल्या सर्वांचे लाडके 'स्टार ऑफ द मिलेनियम', श्रीयुत अमिताभ बच्चन यांचे उदाहरण देऊ इच्छितो. मी त्यांना कधी कोणत्याही राजकीय विषयावर काहीही बोलताना ऐकले नाही, कोणाच्या समर्थनार्थ किंवा कोणाविरूद्ध ही नाही. ते फक्त सर्व मानव जातीसाठी फायदेशीर असेल असे काही सामाजिक कारणास्तव आपले विधान आणि प्रोत्साहन मिडिया मध्ये देतात.

आपण सारे बॉलीवूड कलावंत त्यांना अनुसरु शकतो का? आणि आपण हे लक्षात ठेवू शकतो का की ‘मॉब लिंचिंग’ हे कोणत्याही धर्माचा, जातीचा किंवा समुदायाचा विचार न करता फक्त आणि फक्त मानवतेविरूद्ध केला जाणारा तिरस्करणीय गुन्हा आहे. फुल स्टॉप.

बॉलीवूड आणि मॉब लीन्चींग

अगदी बरोबर , अर्णब सर , मला बॉलीवूड मधील काही सेलिब्रिटींच्या ढोंगीपणा बद्दल शंका आहे. जणू काही लोक काही राजकीय पक्षांच्या छुप्या एजे...